मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

दारूच्या वादातून सासरच्या मंडळींकडून जावयाला बेदम मारहाण!

डोक्यात लाकडी फाटा मारल्याप्रकरणी खोपोलीत ५ जणांवर गुन्हा दाखल


​खोपोली-रायगड, दि. २८ (प्रतिनिधी) :- दारू पिऊन पत्नीशी वारंवार वाद घालत असल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी जावयाला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी फाट्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मौजे आत्करगाव, कुंभेवाडी येथे घडली आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी यांना त्यांचा भाऊ (साक्षीदार) व नातेवाईक हे त्यांची सासरवाडी असलेल्या आत्करगाव, कुंभेवाडी (पो. साजगाव, खालापूर) येथे घरी सोडण्यासाठी आले होते. त्यावेळी फिर्यादी हे दारू पिऊन आल्याचे पाहून त्यांच्या सासऱ्यांनी त्यांच्याशी शाब्दिक वाद घातला. या वादानंतर फिर्यादी व त्यांचा भाऊ सासरवाडीतून निघून आपल्या मूळ गावी मोगलवाडी, खोपोली येथे जाण्यासाठी घरासमोरील अंगणात उभे होते.

​त्याच वेळी, फिर्यादी हे नेहमी दारू पिऊन पत्नीशी भांडण करतात या गोष्टीचा तीव्र राग मनात धरून पाच आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीर मंडळी जमवली. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान आरोपी क्रमांक एक याने हातातील लाकडी फाटा फिर्यादी यांच्या डोक्यात जोराने मारून त्यांना गंभीर जखमी केले.

​या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ नुसार मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२) आणि १९१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog