मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

खालापूर हद्दीतील आसरे गावाजवळून सोलर सिस्टीमची बॅटरी चोरीला

अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल


खालापूर-रायगड​, दि. ३१ (प्रतिनिधी) :- खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसरे गावच्या परिसरामध्ये बसवण्यात आलेली सौरऊर्जा प्रकल्पाची (सोलर सिस्टीम) बॅटरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या उद्देशाने अज्ञात इसमाने सुमारे १८ हजार रुपये किमतीची ही बॅटरी चोरून नेली असून, या प्रकारामुळे स्थानिक परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

​या चोरीच्या घटनेबाबत खालापूर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​घटनेची नोंद घेत पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून, घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमोल धायगुडे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog