मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

दिघी सागरी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न!

आगामी सण शांततेत व सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन


​बोर्ली पंचतन-रायगड, दि. २४ (मुझफ्फर अलवारे) :- आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुरळीत राहावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्यात रविवारी, दि. २३ ऑगस्ट रोजी शांतता समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी आणि पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्छे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये सण-उत्सवांच्या काळात संपूर्ण परिसरात शांतता, सुव्यवस्था व सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.



​या बैठकीसाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांमधील पोलीस पाटील, गाव अध्यक्ष, विविध समाजांचे पदाधिकारी, स्थानिक व्यापारी, पत्रकार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी, सण आणि उत्सव हे परस्परांमधील प्रेम आणि सलोखा वाढवण्यासाठी असतात, त्यामुळे सर्वच समाजबांधवांनी एकमेकांच्या धार्मिक परंपरा, चालीरीती आणि भावनांचा आदर राखून सण शांततेच्या वातावरणात साजरे करावेत, असे आवाहन केले.



​यासोबतच, गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मंडळांनी आणि नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगावी, तसेच मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे व शिस्तीचे काटेकोर पालन करावे, अशा महत्त्वपूर्ण सूचनाही पोलीस प्रशासनाकडून यावेळी देण्यात आल्या. बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांनी पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत आगामी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog