मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

पेणमध्ये महाजन हॉस्पिटलसमोरून दुचाकीची चोरी!

 अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल 


​पेण-रायगड, दि. १३ (प्रतिनिधी) :- पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या महाजन हॉस्पिटलसमोरून एक दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आंतोरे (ता. पेण) येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी यांनी आपली होंडा कंपनीची 'सी.बी. शाईन' (CB Shine) मॉडेलची मोटारसायकल पेण येथील महाजन हॉस्पिटलच्या समोर पार्क केली होती. त्यांची नजर नसताना कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, लबाडीच्या हेतूने आणि फिर्यादीच्या संमतीशिवाय ही दुचाकी चोरून पोबारा केला. आपली मोटारसायकल पार्क केलेल्या जागेवर नसल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी परिसरात शोध घेतला, मात्र दुचाकी मिळून आली नाही. अखेर आपली दुचाकी चोरीला गेल्याची खात्री पटल्यानंतर फिर्यादी यांनी पेण पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पेण पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १५४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ आणि ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार म्हात्रे हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog