मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने रायगडचे अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे सन्मानित! उत्कृष्ट तपासकार्याबद्दल राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या हस्ते पदक प्रदान 🚨

​बिल्किंट डिलिव्हरी बॉयनेच केली घरफोडी!
सातारा शहर डी.बी. पथकाकडून आरोपीला अटक
 १३ लाखांचा मुद्देमाल जप्त 


​सातारा, दि. २४ (प्रतिनिधी) :- डिलिव्हरी देण्याच्या बहाण्याने बंद घरे हेरून घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा 'बिल्किंट' कंपनीचा डिलिव्हरी बॉय असून, त्याच्याकडून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, गुन्ह्यासाठी वापरलेले चारचाकी वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण १३ लाख १ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

​याबाबत मिळालेली माहिती अशी की, शाहूनगर येथील आमराई कॉलनीतील 'शिवालय' अपार्टमेंटमध्ये दिवसाच्या वेळी एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोराने सोन्याचे दागिने लंपास केले होते. या घरफोडीबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे डी.बी. पथकाला एका संशयित आरोपीचे नाव समजले. मात्र, आरोपीचा कोणताही निश्चित पत्ता नसल्यामुळे पोलीस वेगवेगळ्या ठिकाणांहून त्याची माहिती गोळा करत होते.

​गेल्या दोन दिवसांपासून सातारा शहर डी.बी. पथक या आरोपीच्या मागावर होते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास हा संशयित आरोपी एका चारचाकी वाहनातून जात असताना डी.बी. पथकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आणि अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली होती. पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता, त्याने या घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असताना बंद घरांवर पाळत ठेवून घरफोडी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

​सदरची यशस्वी कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले आणि सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सचिन आदमाने तसेच सायबर विभागाचे अंमलदार प्रशांत मोरे आणि रामदास भास्करवाड यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog