मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

 पोलादपूर तालुक्यातील सवाद येथे विवाहितेचा पाठलाग करून धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल


​पोलादपूर-रायगड, दि. १३ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सवाद परिसरात एका विवाहित महिलेचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास देणाऱ्या आणि लग्नाचे नाते तोडण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाविरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सवाद येथील रहिवासी असलेल्या पीडित फिर्यादी महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांचे स्वतःचे दुकान आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी, जो सवाद गावचाच रहिवासी आहे, याने गेल्या काही दिवसांपासून फिर्यादी महिलेवर वाईट हेतू ठेवून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती.  तो वारंवार फिर्यादी यांच्या दुकानात जाऊन त्यांना विनाकारण त्रास देत होता. केवळ दुकानातच नव्हे, तर त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर वेळोवेळी मेसेज करून 'तू आमच्या बरोबर का बोलत नाहीस?' अशी विचारणा करत त्यांचा मानसिक छळ केला.

​आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने फिर्यादी महिलेचा सातत्याने पाठलाग करून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. जर तू माझ्याशी बोलली नाहीस, तर तुझे चालू असलेले लग्न मोडून टाकीन, अशी उघड धमकी त्याने फिर्यादीला दिली. आरोपीच्या या सततच्या त्रासामुळे आणि धमकीमुळे पीडित महिला प्रचंड मानसिक दडपणाखाली आली होती. अखेर या त्रासाला कंटाळून आणि स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली.

​फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलादपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७८ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार कोंडाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला असून, ते या घटनेचे पुरावे आणि तांत्रिक बाबींची पडताळणी करत आहेत. महिलांविरुद्ध होणाऱ्या अशा गुन्ह्यांकडे पोलीस प्रशासन अत्यंत गांभीर्याने पाहत असून, आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog