मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

पोलीस शिपाई चालक पदासाठी उद्या लेखी परीक्षा
उमेदवारांसाठी नियमावली जाहीर

 रायगड जिल्हा पोलीस भरती 


अलिबाग-रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्हा पोलीस दलात सन २०२४-२०२५ या वर्षासाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून, यातील पोलीस शिपाई चालक या पदासाठीची लेखी परीक्षा रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. अलिबाग येथील जे एस एम कॉलेज या परीक्षा केंद्रावर सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० या वेळेत ही परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि कडक सूचना जारी केल्या असून त्यांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.

​परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने सकाळी ८:०० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांकडे मैदानी चाचणीच्या वेळी दिलेले ओळखपत्र आणि लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अशी दोन्ही कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. याशिवाय, प्रवेशपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे पासपोर्ट साईज आकाराचे दोन फोटो सोबत ठेवणे गरजेचे आहे. उमेदवारांना परीक्षा कक्षात केवळ ही कागदपत्रे आणि फोटो नेण्याची परवानगी असून, बॉल पॉइंट पेन आणि लेखनासाठी लागणारे पॅड प्रशासनाकडूनच पुरवले जाणार आहेत.

​पोलीस प्रशासनाने परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. उमेदवारांना हाताला मेहंदी लावून येण्यास मनाई करण्यात आली असून, ओएमआर शीटवरील (OMR SHEET) सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास कडक बंदी आहे. यामध्ये मोबाईल फोन, डिजिटल डायरी, मायक्रोफोन, कॅमेरा, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ डिव्हाइस किंवा कोणत्याही प्रकारच्या नोट्स आणि पुस्तकांचा समावेश आहे.

​जर एखादा उमेदवार परीक्षा केंद्रात अशा प्रतिबंधित वस्तूंसह किंवा कॉपी करण्याच्या उद्देशाने साहित्य घेऊन आल्याचे आढळल्यास, त्याची उमेदवारी तात्काळ रद्द केली जाईल. इतकेच नव्हे तर, अशा कसूरदार उमेदवारांविरुद्ध 'महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम २०२४' अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक तथा रायगड जिल्हा पोलीस भरती समिती अध्यक्ष आँचल दलाल यांनी दिला आहे. 


टीप :- बातमीतील घटनेच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI (Artificial intelligence) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Comments

Popular posts from this blog