मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

पुणे शहर परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची मोठी तपासणी मोहीम
 अनेक गुन्हे दाखल 


पुणे वृत्त (रणजीत मस्के) :- पुणे शहरात सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी आणि अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार परिमंडळ-१ च्या कार्यक्षेत्रात १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल ४२ मोकळ्या जागा, ब्लॅक स्पॉट आणि सार्वजनिक ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली. या धडक कारवाईदरम्यान भारतीय न्याय संहिता कलम २८५ नुसार ३ गुन्हे, तर कोटपा (COTPA) कायद्यांतर्गत १२ खटले दाखल करण्यात आले. तसेच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या ३१ 'ट्रिपल सीट' वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत २२ खटले भरण्यात आले आहेत. याशिवाय अमली पदार्थ विरोधी (NDPS) कायद्यान्वये २ गुन्हे आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत ४ गुन्हे दाखल करत पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्धचा बडा इंगा दाखवला आहे.










सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेचे प्रत्यक्ष नियोजन परिमंडळ-१ चे पोलीस उप-आयुक्त कृषिकेश रावले यांनी केले होते. या मोहिमेत परिमंडळ-१ मधील सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी आणि मोठ्या संख्येने पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला होता. सार्वजनिक ठिकाणी होणारे उपद्रव थांबवून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

Comments

Popular posts from this blog