मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गोमांसाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
खोपोली पोलीसांनी चौघांना ठोकल्या बेड्या


​खोपोली, दि. ३ (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका पिकअप वाहनाचा अपघात झाला असता, त्यातून गोवंश सदृश मांसाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, पोलीसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे, तर वाहनाचा चालक सध्या फरार आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर, किलोमीटर क्रमांक ३४/८०० जवळ हा प्रकार घडला. खालापूर तालुक्यातील खोपोली फूडमॉलजवळ पिकअप वाहन (क्रमांक एम.एच.०१.जी.ए.ईई.०५२८) घेऊन चालक आरोपी क्रमांक ५ हा मुंबईच्या दिशेने जात होता. हे वाहन अत्यंत भरधाव वेगात, हयगईने आणि बेदरकारपणे चालवले जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले.

​अपघातानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सदर पिकअप वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले गोवंश सदृश मांस मिळून आले. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपी क्रमांक १ आणि त्याचे दोन सहकारी (आरोपी २ व ४) यांनी संगणमत करून गोवंशीय प्राण्यांची कत्तल केली होती. हे मांस विक्री करण्यासाठी आरोपी क्रमांक ३ या व्यापाऱ्याने खरेदी केले होते आणि त्याची वाहतूक केली जात होती. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आरोपी क्रमांक १, २, ३ आणि ४ या चौघांना खोपोली पोलीसांनी २ एप्रिल रोजी दुपारी २:५४ वाजता अटक केली आहे. मात्र, अपघातानंतर पिकअप चालक (आरोपी ५) घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

​पोलीसांनी या कारवाईत पिकअप वाहन आणि गोमांसासह एकूण १४ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५, २८१, ३(५) तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम १८४ आणि महाराष्ट्र प्राणी (पशु) रक्षण (सुधारणा) अधिनियम १९७६ चे कलम ५, ५(A), ५(B), ५(C) आणि ९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे हे करीत आहेत. एक्सप्रेसवेवर झालेल्या या कारवाईमुळे अवैध मांस तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Comments

Popular posts from this blog