मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक


कोल्हापूर वृत्त (रणजीत मस्के) :- ​कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती, या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत तीन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण १२ मोटारसायकली जप्त केल्या असून, यातून चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे ५ लाख २० हजार रुपये इतकी आहे.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने केली. पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, फुलेवाडी रिंग रोड परिसरात सापळा रचून संशयित दर्शन रमेश जाधव (वय २६) आणि फारूक फिरोज शेख (वय १९) यांना विना नंबर प्लेटच्या गाड्यांसह ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, ज्यानंतर त्यांच्याकडून आणखी काही वाहने हस्तगत करण्यात आली. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी त्यांचा तिसरा साथीदार प्रतीक विलास पाटील यालाही ताब्यात घेतले.

​आरोपींकडून जप्त केलेल्या वाहनांमध्ये स्प्लेंडर, यामाहा, ॲक्सेस, केटीएम ड्युक आणि वेस्पा मोपेड यांसारख्या विविध नामांकित कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चोरी लपवण्यासाठी काही वाहनांचे चेसिस आणि इंजिन नंबर खोडून त्यामध्ये फेरफार करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, वैभव पाटील, गजानन गुरव आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून, या टोळीने आणखी कुठे हातसाफ केला आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments

Popular posts from this blog