मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

हजरत मीरा मोहिद्दीन शाह र. अ. उर्स कमेटी २०२६ : अध्यक्षपदी काझिम यासीन पानसरे यांची बिनविरोध निवड 

नागोठणे (सुहेल पानसरे) :- सलाबादप्रमाणे रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या हजरत मीरा मोहिद्दीन शाह र. अ. यांचा उर्स संदल ५ एप्रिल आणि कव्वाली ६ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. सदर उर्स कमेटीच्या अध्यक्षपदी काझिम पानसरे, उपाध्यक्षपदी दानिश इलामी, खजिनदारपदी इम्रान मुल्ला, सेक्रेटरीपदी मुजफ्फर कडवेकर आणि सह-सेक्रेटरीपदी अरबार फामे यांची निवड झाली आहे. ५ एप्रिल रोजी संदल आणि ६ एप्रिल रोजी कव्वालीचे आयोजन आहे. मुंबईचे मशहूर कव्वाल जनाब अजीम नाझा आणि जनाब रिझवान चिस्ती यांचा जंगी मुकाबला होणार असून, भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. यंदाचा उर्स भक्तीमय वातावरणात होईल, असे अध्यक्ष काझिम पानसरे यांनी सांगितले. सदर उर्सची जमात ४ मार्च रोजी हुजरा मोहल्ला, नागोठणे येथे मागील वर्षीच्या अध्यक्ष जनाब गुलजार शिंदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. शेवटी, हजर जमातीचे आभार नवनिर्वाचित अध्यक्ष काझिम पानसरे यांनी मानले आणि नवीन कमेटीचे पदाधिकारी व सदस्यांनी उर्सच्या कामाला लागा असे आवाहन केले आहे.


Comments

Popular posts from this blog