मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

नागोठणे येथे हजरत मीरामोहिद्दीन शाह बाबा प्रवेशद्वाराजवळील रिलायन्स रोड परिसरात अपघातग्रस्त इको कार जळून खाक 

 कोणतीही जीवितहानी नाही 

नागोठणे, ९ मार्च (सुहेल पानसरे) :- मुंबई-गोवा महामार्गावर हजरत मीरामोहिद्दीन शाह बाबा प्रवेशद्वाराजवळ रिलायन्स रोड परिसरात आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास एक अपघातग्रस्त इको कार अचानक जळून खाक झाली. ही आग इतकी भयंकर होती की, आजूबाजूच्या परिसरातही पसरली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रिलायन्स कंपनीच्या अग्निशमन दलाने एकत्र येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, 

परंतु गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी उष्णतेच्या तीव्रतेमुळे ती लागली असावी, असे स्थानिकांचे मत आहे. नागोठणे पोलीस स्टेशनच्या सहकार्याने जळलेली गाडी रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.


Comments

Popular posts from this blog