रोहा तालुक्यातील वणी गावात शाळेमागे आढळलेल्या ८ फुटी अजगराला जीवदान शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला बेणसे-रायगड, दि. १२ (चंद्रकांत अडसुळे) :- रोहा तालुक्यातील वणी गावातील शाळेच्या पाठीमागे बुधवारी (दि. ११ नोव्हेंबर २०२६) सकाळी सुमारे आठ फूट लांबीचा आणि पंधरा किलो वजनाचा महाकाय अजगर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सुदैवाने घटनेच्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी शाळेत नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, शाळेच्या अगदी जवळच हा भलामोठा अजगर दिसून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक दीपक आवाद, किशोर मांडळुस्कर आणि दीपेंद्र आवाद यांनी प्रसंगावधान राखत सकाळी दहा वाजता तात्काळ सर्पमित्र तथा कामगार नेते किशोर शिर्के यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून याबाबत कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र किशोर शिर्के यांनी तातडीने वणी गावात धाव घेतली. शाळेच्या पाठीमागील दाट झुडपांमध्ये लपलेल्या या अजगराचा त्यांनी अत्यंत कौशल्याने शोध घेतला. स्थानिकांच्या मदतीने आणि कोणतीही इजा होऊ न देता त्यांनी या आठ फ...
मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
रायगड जिल्हा पोलीस दलातील २७ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना 'श्रेणी पोलीस उपनिरीक्षक' पदाचा बहुमान २७ खाकी रक्षकांचा सन्मान, ३० वर्षांच्या सेवेची पोचपावती रायगड, दि. १० (प्रतिनिधी) :- रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर दीर्घकाळ प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या २७ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना (एएसआय) अखेर 'श्रेणी पोलीस उपनिरीक्षक' (Grade PSI) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पात्र अंमलदारांना २७ ऑक्टोबर २०२६ पासून हे संबोधन लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस नाईक हे संवर्ग रद्द करून त्यातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संवर्गात वर्ग करण्याचे आदेश जारी केले होते. या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक स्तरावर गठित सुकाणू समितीच्या निकषांनुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली. पोलीस सेवेत ३० वर्षे पूर्ण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर किमान ३ वर्षे सेवा आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचे वे...
रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे अलिबाग येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. काळोखे यांचा प्रामाणिकपणा! सापडलेला मोबाईल व पर्स मूळ मालकाला केली परत रायगड, दि. १० (प्रतिनिधी) :- रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे अलिबाग येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. काळोखे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे एका नागरिकाचा हरवलेला मौल्यवान ऐवज सुखरूप परत मिळाला आहे. अलिबाग येथील गजबजलेल्या रिलायन्स चौक परिसरात कर्तव्य बजावत असताना पोलीस उपनिरीक्षक श्री. काळोखे यांना रस्त्यावर एक मोबाईल फोन आणि पैशांचे पाकीट (पर्स) बेवारस स्थितीत पडलेले आढळून आले. त्यांनी तात्काळ सदर वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या आणि कोणताही विलंब न लावता मूळ मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मोबाईल व पाकिटातील कागदपत्रांच्या आधारे शहानिशा करत त्यांनी संबंधित मालकाची योग्य ती खात्री व ओळख पटवली. त्यानंतर संबंधितांशी संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष बोलावून घेण्यात आले. योग्य ती पडताळणी पूर्ण केल्यानंतर पीएसआय काळोखे यांनी सापडलेला मोबाईल आणि पर्स त्या नागरिकाच्या स्वाधीन केली. आपला हरवलेला फोन आणि पर्स कोणतीही हानी न होता सुखरूप परत मिळाल्यामुळे ...
राष्ट्रीय स्कूल टेनिस स्पर्धेत सूर्या काकडेची रौप्यपदकाला गवसणी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना अंतिम फेरीपर्यंत धडक! गुजरात, कर्नाटक आणि हरियाणावर मात रोहा, दि. १० नोव्हेंबर (प्रतिनिधी) :- दिल्ली येथे पार पडलेल्या ७० व्या राष्ट्रीय स्कूल गेम्स २०२६-२७ लॉन टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सूर्या कमलेश काकडे याने सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावत आपल्या क्रीडा कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अवघ्या १७व्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे सूर्या याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिल्लीतील त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली सरकारच्या डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशन, जीएनसीटी ऑफ दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना सूर्या याने बाद फेरीत गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांच्या संघांना पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात महाराष्ट्रासमोर चंदिगढ...

Comments
Post a Comment