मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

नगरसेवक पदाच्या मानधनाला नम्रपणे नकार; रुग्णसेवेसाठी महापौर निधीत जमा
नगरसेवक राघवेंद्र (बाप्पु) मानकर यांची प्रेरणादायी कामगिरी

पुणे, दि. ११ फेब्रुवारी (प्रतिनिधी) :- नगरसेवक पदाचे मासिक मानधन आणि इतर सर्व भत्ते पुणे महानगरपालिका प्रभाग २५ (ब) चे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पु) मानकर यांनी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम महापौर निधीमध्ये वर्ग करून रुग्णसेवेसाठी विनियोग करण्याचे आवाहन केले. त्यांनी याबाबतचे पत्र नगरसचिव मा. योगिता भोसले मॅडम यांना दिले. ही रक्कम शहरातील गरजू रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी खर्च करण्यात यावी, असे आवाहन नगरसेवक राघवेंद्र (बाप्पु) मानकर यांनी प्रशासनाला केले आहे.
'माझ्यासाठी नगरसेवक पद हे समाजाच्या सेवेचे माध्यम आहे. प्रभागातील नागरिकांनी टाकलेल्या विश्वासाच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून मिळणारे मानधन हे पुन्हा त्यांच्याच सेवेसाठी खर्च व्हावे, या भावनेतून मी हा निर्णय घेतला. ही केवळ जनसेवेसाठी मिळालेली जबाबदारी असून, यातून मिळणारे समाधान माझ्यासाठी अधिक मोलाचे आहे', अशी प्रतिक्रीया नगरसेवक श्री. मानकर यांनी व्यक्त केली.
नगरसेवक पदाच्या मानधनाला नम्रपणे नकार दिला. ही रक्कम पूर्णपणे महापौर निधीत जमा करून रुग्णसेवेसाठी वापरण्याचा त्यांचा निर्णय अनेकांना प्रेरणादायी ठरला आहे. नागरिकांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असून. "असे नेते खरंच दुर्मीळ आहेत," अशा प्रकारच्या प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.


Comments

Popular posts from this blog