मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨

वाळू माफीयांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दोन आरोपींकडून १० लाख २० हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर वृत्त, दि. १८ (रणजीत मस्के) :- अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुध्द कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते.
नमूद आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब खेडकर, अमोल अजबे, किशोर शिरसाठ यांचे पथक तयार करुन अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले. त्यानंतर हे पथक शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळू उपसा/वाहतुक बाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत थाटे गावामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची चोरून वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने थाटे गावच्या बस स्टॅण्ड येथे सापळा लावून थांबले असता. तेव्हा पथकास दोन ट्रॅक्टर तोडोळी ते थाटे रोडने थाटे बस स्टॅण्डकडे येताना दिसले. तेव्हा पथकाने सदर वाहने थांबवून चालकांना ताब्यात घेऊन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यानीं त्यांची नावे १) अक्षय कल्याण दौंड वय -२७ वर्षे,  रा. सोनोशी, ता. पाथर्डी, २) अजिनाथ विक्रम काकडे वय- ४० वर्षे, रा. सोनोशी ता. पाथर्डी असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपुस करता त्यांनी त्यांचेकडे कोणताही वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याचे कळविले आहे.
ताब्यातील इसमाचे कब्जातुन १० लाख रुपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली,  २० हजार रू. किंमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण १० लाख २० हजार रू. रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींविरुध्द पो.कॉ./782 किशोर आबासाहेब शिरसाठ नेमणूक - स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ९०/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


Comments

Popular posts from this blog