मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨

फसवणुकीच्या गुन्ह्यातील खटल्या प्रकरणी आरोपीस सक्षम कारावास व दंडाची शिक्षा

उरण (विठ्ठल ममताबादे) :- नोकरी लावून देतो असे सांगून पैसे उकळविण्याचे अनेक गैरप्रकार समाजात मोठया प्रमाणात घडत आहेत. अशा घटनाना वेळीच आळा बसने महत्वाचे आहे. अशा घटना वाढत असतानाच उरण न्यायालयाने एक सर्वांसाठी दिलासादायक निकाल दिला आहे. या निकाला मुळे आर्थिक फसवणूकीला आळा बसेल अशी आशा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.आर्थिक फसवणूक मधील एका केसमधील आरोपी याने फिर्यादी यांचेकडून रक्कम रुपये ५,००,०००/-(अक्षरी रुपये पाच लाख) स्विकारुन व इतर २१ पिडीतांकडू देखिल पैसे स्विकारुन १ महिन्यात NAD मध्ये कायमस्वरुपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून, प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न लावून देता त्यांची फसवणूक केली म्हणून आरोपी  संतोष अनंत पेढवी यांचे विरोधात उरण पोलीस ठाणे मध्ये नियमित फौजदारी खटला क. ७०/२०२०, गु.र.न. २१/२०२०, भा.द.वि. कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सदरचा खटला उरण येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  एम. एस. काझी उरण न्यायालय क्र. १ यांचे न्यायालयात चालू असताना सदर खटल्यामध्ये  न्यायालयाने आरोपी  संतोष अनंत पेढवी यांस दोषी ठरवून भा.द.वि. कलम ४२० अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व रक्कम रुपये ५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार) दंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास देण्याचा आदेश पारीत केला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आर्थिक फसवणुकीला बळी पडू नका. कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. पैसे देऊन कुठेही नोकरीला लागू नका. कोणत्याही एजेंटच्या नादी लागू नका. उरण न्यायालयाने चांगला निकाल दिला आहे. या निकाला मुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे असे मत उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानीफ मुलाणी यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog