रोहा तालुक्यातील वणी गावात शाळेमागे आढळलेल्या ८ फुटी अजगराला जीवदान शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला बेणसे-रायगड, दि. १२ (चंद्रकांत अडसुळे) :- रोहा तालुक्यातील वणी गावातील शाळेच्या पाठीमागे बुधवारी (दि. ११ नोव्हेंबर २०२६) सकाळी सुमारे आठ फूट लांबीचा आणि पंधरा किलो वजनाचा महाकाय अजगर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सुदैवाने घटनेच्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी शाळेत नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, शाळेच्या अगदी जवळच हा भलामोठा अजगर दिसून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक दीपक आवाद, किशोर मांडळुस्कर आणि दीपेंद्र आवाद यांनी प्रसंगावधान राखत सकाळी दहा वाजता तात्काळ सर्पमित्र तथा कामगार नेते किशोर शिर्के यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून याबाबत कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र किशोर शिर्के यांनी तातडीने वणी गावात धाव घेतली. शाळेच्या पाठीमागील दाट झुडपांमध्ये लपलेल्या या अजगराचा त्यांनी अत्यंत कौशल्याने शोध घेतला. स्थानिकांच्या मदतीने आणि कोणतीही इजा होऊ न देता त्यांनी या आठ फ...
मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे अलिबाग येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. काळोखे यांचा प्रामाणिकपणा! सापडलेला मोबाईल व पर्स मूळ मालकाला केली परत रायगड, दि. १० (प्रतिनिधी) :- रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे अलिबाग येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. काळोखे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे एका नागरिकाचा हरवलेला मौल्यवान ऐवज सुखरूप परत मिळाला आहे. अलिबाग येथील गजबजलेल्या रिलायन्स चौक परिसरात कर्तव्य बजावत असताना पोलीस उपनिरीक्षक श्री. काळोखे यांना रस्त्यावर एक मोबाईल फोन आणि पैशांचे पाकीट (पर्स) बेवारस स्थितीत पडलेले आढळून आले. त्यांनी तात्काळ सदर वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या आणि कोणताही विलंब न लावता मूळ मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मोबाईल व पाकिटातील कागदपत्रांच्या आधारे शहानिशा करत त्यांनी संबंधित मालकाची योग्य ती खात्री व ओळख पटवली. त्यानंतर संबंधितांशी संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष बोलावून घेण्यात आले. योग्य ती पडताळणी पूर्ण केल्यानंतर पीएसआय काळोखे यांनी सापडलेला मोबाईल आणि पर्स त्या नागरिकाच्या स्वाधीन केली. आपला हरवलेला फोन आणि पर्स कोणतीही हानी न होता सुखरूप परत मिळाल्यामुळे ...
नवी मुंबईत नाकाबंदीदरम्यान पोलिसाला भरधाव कारच्या बोनेटवर २०० मीटर फरफटत नेले कळंबोलीतील धक्कादायक घटना, आरोपी फरार नवी मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) :- नवी मुंबईतील कळंबोली परिसरात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अंमलदाराच्या अंगावर भरधाव कार घालून त्यांना तब्बल २०० मीटर अंतरापर्यंत बोनेटवर फरफटत नेल्याची संतापजनक घटना घडली आहे. या भीषण अपघातात पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळंबोली परिसरात पोलिसांकडून नियमित वाहन तपासणीसाठी नाकाबंदी लावण्यात आली होती. दरम्यान, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका संशयित स्विफ्ट डिझायर कारला कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडीचा वेग कमी करण्याऐवजी थेट समोर उभे असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे भोई हे हवेत उडून थेट कारच्या बोनेटवर जाऊन पडले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी बोनेट घट्ट पकडून ठेवले; तरीही चालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगाने तशीच पुढे दामटवली. त्यामुळे कॉन्स्टेबल भोई यांना बोनेटवर लटकलेल्या अवस्थेत सुमारे...
रायगड जिल्हा पोलीस दलातील २७ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना 'श्रेणी पोलीस उपनिरीक्षक' पदाचा बहुमान २७ खाकी रक्षकांचा सन्मान, ३० वर्षांच्या सेवेची पोचपावती रायगड, दि. १० (प्रतिनिधी) :- रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर दीर्घकाळ प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या २७ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना (एएसआय) अखेर 'श्रेणी पोलीस उपनिरीक्षक' (Grade PSI) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पात्र अंमलदारांना २७ ऑक्टोबर २०२६ पासून हे संबोधन लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस नाईक हे संवर्ग रद्द करून त्यातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संवर्गात वर्ग करण्याचे आदेश जारी केले होते. या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक स्तरावर गठित सुकाणू समितीच्या निकषांनुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली. पोलीस सेवेत ३० वर्षे पूर्ण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर किमान ३ वर्षे सेवा आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचे वे...

Comments
Post a Comment