मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨

५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 

उप-मुख्यालय बऱ्हाणपूर पुणे ग्रामीण येथे बक्षीस वितरण व समारोप समारंभ संपन्न

कोल्हापूर वृत्त (रणजीत मस्के) :- ५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ आयोजित करण्याचा मान यावर्षी पुणे ग्रामीण पोलीस दलास मिळाला होता. या क्रीडा स्पर्धा दिनांक १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीमध्ये पोलीस उप मुख्यालय, बहऱ्हाणपुर बारामती, पुणे ग्रामीण येथे संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धेचा समारोप समारंभ परेड ग्राउंड पोलीस उप-मुख्यालय, बष्हाणपुर, बारामती पुणे ग्रामीण याठिकाणी दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडला.

५१ व्या कोल्हापुर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा २०२५ समारोप समारंभ प्रसंगी मा. श्री. दीपक शिवानंद पाण्डेय (भा. पो. से.) अप्पर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण, माहीती तंत्रज्ञान व परिवहन, महाराष्ट्र राज्य, पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर मा. श्री. सुनील फुलारी (भा. पो. से) विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर हे कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भुषविले. सदर समारोप समारंभास मा. श्री संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे गामीण, मा. श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, मा. गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, श्री. दिलीप शिंदे, पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय, पुणे ग्रामीण, श्री. मधुकर भटे, पोलीस उपअधीक्षक, उप मुख्यालय, बऱ्हाणपूर पुणे ग्रामीण व पोलीस अधिकारी, अंमलदार हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या निमंत्रणास मान देऊन मा. श्री. एम राजकुमार सोलापूर शहर पोलीस आयुक्त, मा. श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा मा. श्री. अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. श्री. योगेशकुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर, मा. श्री. संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली हे ही उपस्थित होते. 

कार्यक्रामच्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या आगमनावेळी यमाई हलगी ग्रुप अकलुज व तुषार मावळा ग्रुप बारामती यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस पुरुष व महिला यांची १०० मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली, सदर स्पर्धा काळजाचा ठोका चुकविणारी झाली. त्यामध्ये पुरुष गटामध्ये चैतन्य मरडे सातारा यांनी तर महीला गटामध्ये गौरी सावंत सातारा यांनी प्रथम क्रमांक मिळवला मा. पोलीस अधीक्षक श्री संदीपसिंह गिल्ल (भा. पो. से.) यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यामध्ये त्यांनी प्रमुख अतिथी तसेच निमंत्रीत मान्यवर यांचे स्वागत करुन खेळाडुंना मार्गदर्शन करताना, खेळामुळे खेळांडुमध्ये शारिरीक तंदुरुस्ती, उत्साह, संघ भावना तसेच मानसिक स्वैर्य निर्माण होवुन विविध गुणांचा विकास होतो व पोलीस दलातील ऐक्य निर्माण होण्यास मदत होते बाबत मत व्यक्त करुन उपस्थित खेळाडूंना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर प्रमुख उपस्थित मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी (भा. पो. से.) यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून विजेत्या खेळाडुंचे अभिनंदन केले तसेच उर्वरित खेळाडूंना मार्गदर्शन करुन शुभेच्छा देवून आगामी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेकरीता तयारी करण्यासाठी तसेच कोल्हापुर परिक्षेत्र व महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव मोठे करावे याकरिता शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेदरम्यान शाळांना निमंत्रण देवून पोलीस आणि नागरीक यांच्यात समन्वय साधण्याचा उत्तम प्रयत्न केला. सदर स्पर्धेत सहभागी खेळाडु व पोलीसांनी अचुक बंदोबस्त करून कायदा व सुव्यवस्था सांभाळुन उत्तम यश संपादन केले त्याबददल त्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे या स्पर्धेदरम्यान उपस्थित खेळाडू व अधिकारी यांची उत्तम राहण्याची जेवणाची तसेच वाहतुकीची सोय करण्यात आलेबाबत सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. दीपक शिवानंद पाण्डेय (भा. पो. से.) अप्पर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण, माहीती तंत्रज्ञान व परिवहन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या निमंत्रणाबाबत आभार मानुन कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरित्या केले होते असे सांगितले, त्यानंतर त्यांनी खेळाडुंनी केलल्या परेड संचालनाचे व बॅन्ड पथकाच्या प्रदर्शनाचे कौतुक करून यशस्वी खेळाडुंना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

५१ व्या कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ स्पर्धेतील खेळाडू, संघ प्रमुख, टिम मॅनेजर, आयोजन कमीटीतील विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य पंच मेडिकल टिम, यांचे उपस्थित सर्व पोलीस उपअधीक्षक, इतर पोलीस अधिकारी व उपस्थितांचे आभार प्रदर्शन श्री. गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, बारामती यांनी केले. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये ७ प्रकारचे विविध सांघिक खेळप्रकार, १२ प्रकारचे विविध वैयक्तिक खेळप्रकारांचा समावेश असून सदर स्पर्धेमध्ये पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापुर ग्रामीण व सोलापुर शहर या घटकातील ९०० पुरुष व २५० महिला पोलीस खेळाडूंनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. यंदाच्या स्पर्धा या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मात्र अत्यंत चुरशीच्या व रोमहर्षक पध्दतीने पार पडल्या. 

सांगता समारोपाच्या कार्यक्रमामध्ये गुणवंत व विजेत्या संघांचे व खेळाडू यांना बक्षिस वितरण हे श्री. दीपक शिवानंद पाण्डेय (भा. पो. से.) अप्पर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण, माहीती तंत्रज्ञान व परिवहन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये पुणे ग्रामीण, कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर ग्रामीण व सोलापुर शहर अशा ०६ संघांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेमध्ये पुरुष व महिला विभागात सर्व साधारण विजेते पद देण्यात आले आहेत. हे सर्वसाधारण विजेतेपद २०७ गुणांसह सातारा जिल्हयाने पटकावले पुरूष विभागामध्ये दुसण्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे कोल्हापुर व सांगली हे जिल्हा पोलीस संघ तर महिला विभागामध्ये दुसच्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे कोल्हापूर व सांगली हे जिल्हा पोलीस संघ राहिले. त्याचप्रमाणे ॲथलेटिक्समध्ये पुरुष व महिला विभागात सातारा यांनी ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप घेतली आहे. संपूर्ण स्पर्धेतील पुरुष व महिला विभागातील उत्कृष्ट ॲथलिट हा मान चैतन्य मरडे सातारा व गौरी सावंत सातारा यांनी पटकावला. सदर स्पर्धेतील प्रत्येक सामने हे रोमहर्षक व क्रीडा रसिकांना अभुतपुर्व पर्वणीचे ठरले. सदर स्पर्धेस आजी-माजी राष्ट्रीय खेळाडूंनी आवर्जून हजेरी लावून खेळाडुंना प्रोत्साहित केले.

श्री गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग बारामती यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप हा वादयवृंद पथकाच्या रिट्रीट झाल्यानंतर व सायोनारा या गीताने करण्यात आला. त्यानंतर उपस्थित अधिकारी व अंमलदार यांच्याकरीता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला. यावेळी लोककलेची ललकार मुंबई यांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यकमाचा प्रमुख उददेश लोप पावलेल्या कला सादर करून त्याचे जतन आणि संवर्धन करून पुढील पिढीला वारसा हस्तांतरीत करणे हा आहे. यामध्ये कलाकारांनी महाराष्ट्राच्या लोककला उदा. भारूड, पिंगळा लोकनृत्य त्यामध्ये गोंधळी, वारी तसेच प्रचलित महाराष्ट्रातील लोकगिते सादर केली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यावेळी गायनातुन सांगण्यात आला. यामध्ये परंपरा आणि नाविण्याचा सुरेख संगम दिसून आला.

५१ वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ याकरीता उपस्थित सर्व निमंत्रीत, वरीष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सर्व जिल्ह्याचे खेळाडू अशा सर्व उपस्थितांकरीता पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे बडाखानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला.


Comments

Popular posts from this blog