मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

महाडमधील बेकायदा जुगारावर पोलीसांची कारवाई; मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल
ॲड. काशिनाथ ठाकूर यांच्या उच्चस्तरिय तक्रारींमुळे कारवाईचे आदेश


महाड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यात सर्वत्र अवैध मटका जुगार सुरू असताना देखील रायगड जिल्ह्यात छुप्या पद्धतीने मटका जुगार सुरू असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृह विभाग, पोलीस अधीक्षक,  यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती. त्यानंतर महाड शहरातील सुकट गल्ली येथे नगरपालिकेच्या गाळ्याच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत बेकायदा सुरू असलेल्या फुलपाखरू भिंगरूट नावाच्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकून मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त केली.

याप्रकरणी महाड शहर  पोलीस ठाणे येथे  गुन्हा रजिस्टर नंबर 157/2025, महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे
आरोपी नरेश नामदेव जाधव (वय - 35), रा. विन्हेरे, ता. महाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.
ही पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पो.हवा/ सुदीप पहेलकर. पो.शि. / लालासाहेब वाघमोडे, पो.शि./ मोरेश्वर ओमले यांनी ही यशस्वी कामगिरी केली.

Comments

Popular posts from this blog