मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨
अंबरनाथ पोलीसांची धडाकेबाज कारवाई 
कर्नाटकातील गुन्ह्यात असलेल्या आरोपींना अटक


अंबरनाथ वृत्त (रणजीत मस्के) :- भेडंगिरी पोलीस ठाणे, हुबळी (कर्नाटक) येथील गुन्हा रजि. क्र. 126/2025 (BNS कलम 103, 109) मधील पाहिजे आरोपींना अटक करण्यात अंबरनाथ पोलीसांनी मोठे यश मिळवले आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शास्त्रीनगर, अंबरनाथ (पश्चिम) परिसरात आरोपी येणार असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीसांनी जलदगतीने सापळा रचून ही कारवाई केली.
पोलीसांनी आरोपींना पळून जाण्याची कोणतीही संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत दोन्ही आरोपींची ओळख पुढीलप्रमाणे पटली :- कार्तिक हनुमंता हराळे (वय 19 वर्षे) राहणार – गंगाधरनगर, हुबळी, कर्नाटक, सुजल प्रकाश गायकवाड (वय 19 वर्षे), राहणार – गंगाधरनगर, हुबळी, कर्नाटक
अंबरनाथ पोलीसांनी दोन्ही आरोपींना आवश्यक ते औपचारिकता पूर्ण करून भेडंगिरी पोलीस ठाणे, हुबळी (कर्नाटक) यांच्या ताब्यात सुपूर्द केले असून पुढील कारवाई कर्नाटक पोलीसांकडून करण्यात येणार आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४ सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात श्री शाहू काळदाते, पो.हवा. 6592 पथवे, पोना 2407 अनिस शेख, पो.शि. 8228 वसुदेव दराडे, पो.शि. 4160 गणेश गुत्ते आणि पो.शि. 34 स्वप्निल पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अंबरनाथ पोलीसांच्या या तत्पर आणि अचूक कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून तसेच पोलीस विभागाकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog