मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

अवैध गावठी दारू विरोधात अकोला पोलीसांचे "ऑपरेशन प्रहार"
महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अंतर्गत ७६ केसेस व ७ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोला (प्रतिनिधी) :- अकोला पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणार्या विरुद्ध 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १० नोव्हेंबर २०२५ व दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ दोन दिवस सकाळी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत ही मोहीम प्रभावीपणे पार पडली. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील पोलीस पथकांनी एकूण ७५ ठिकाणी कारवाई केली आहे.

कारवाईदरम्यान सुमारे ७,३६,४२५/- रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तर अवैध धंद्यात सामील असलेल्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, तसेच, स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे ०१ ठिकाणी छापा टाकत अवैध दारू विकी व निर्माण करणाऱ्या ठिकाणांतर धडक देवुन लिटर गावठी दारू ०५ लिटर व १०० लिटर सडवा मोहमात्त एकूण किंमत १६०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशा प्रकारे अकोला जिल्हा पोलिसांनी एकूण ७,५४, २२५/- रुपयांच्या अवैध दारू साहित्यावर कारवाई केली आहे.

अवैध गावठी दारू उत्पादनामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतुन व शांतता भंग होते, या पार्शवभूमीवर अकोला पोलिस दलाने अशा अवैध धंद्यावर कठोर कारवाई करताना जनतेचा विश्वास कायम ठेवला आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी या पुढे सुध्दा नेहमी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने कळविले आहे.

अवैध दारू विरोधातील ही मोहीम सुरूच राहणार असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर अवैध दारू विकी व निर्माण करणाऱ्या विषयी माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन अकोला पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.


Comments

Popular posts from this blog