अंबड नगरपरिषद निवडणूक: 'स्ट्रॉंग रूम'ला त्रिस्तरीय अभेद्य सुरक्षा कवच; ईव्हीएम सुरक्षित स्ट्रॉंग रूम परिसरात सीसीटीव्हीची नजर आणि सशस्त्र जवानांचा २४ तास कडक पहारा - निवडणूक निर्णय अधिकारी विजय चव्हाण यांची माहिती विशेष वृत्त : रणजित मस्के अंबड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया अत्यंत भयमुक्त, शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. मतदानानंतर सर्व इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स (EVM) येथील 'स्ट्रॉंग रूम'मध्ये अत्यंत सुरक्षित रित्या ठेवण्यात आल्या असून, या ठिकाणाला अभेद्य सुरक्षा पुरविण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे. उमेदवारांच्या समक्ष सीलिंग प्रक्रिया पूर्ण मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, निवडणूक निरीक्षक श्री. संतोष घोडके, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. सिद्धेश्वर धुमाळ, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री. मनोज किर्दे यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम सील करण्यात आली. तत्पूर्वी, उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना स्ट्रॉंग रूमची ...