महाडमधील बेकायदा जुगारावर पोलीसांची कारवाई; मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल ॲड. काशिनाथ ठाकूर यांच्या उच्चस्तरिय तक्रारींमुळे कारवाईचे आदेश महाड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यात सर्वत्र अवैध मटका जुगार सुरू असताना देखील रायगड जिल्ह्यात छुप्या पद्धतीने मटका जुगार सुरू असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृह विभाग, पोलीस अधीक्षक, यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती. त्यानंतर महाड शहरातील सुकट गल्ली येथे नगरपालिकेच्या गाळ्याच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत बेकायदा सुरू असलेल्या फुलपाखरू भिंगरूट नावाच्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकून मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 157/2025 , महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे आरोपी नरेश नामदेव जाधव (वय - 35), रा. विन्हेरे, ता. महाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. ही पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पो.हवा/ सुदीप पहेलकर. पो.शि . / लालासाहेब वाघमोडे, पो.शि ./ मोरेश्वर ओमले यांनी ही यशस्वी कामगिरी केली....
Popular posts from this blog
घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्यात पालघर पोलीसांना यश पालघर (प्रतिनिधी) :- पालघर पोलीस ठाणे हद्दित दि.१७ ऑक्टोबर २०२५ रोजी ११.०० वाजता ते १३.०० वाजताचे सुमारास फिर्यादी श्री. मनोज अशोक कापडीया, यय ४४ वर्षे, रा. शेवंती अपार्टमेंट पालघर हे त्यांचे पत्नी सोबत घरगुती सामान खरेदी करण्याकरीता बाजारात गेलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे फ्लॅटच्या दरवाजाचा तोडुन त्यावाटे घरात प्रवेश करुन कपाट उघडुन लॉकर मध्ये ठेवलेल्या स्टिलच्या डब्यातील एकूण ९२,०००/- रु. किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, चैन व हार असे फिर्यादी यांचे संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्या करीता घरफोडी करून चोरुन नेलेबाबत पालघर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २६७/२०२५ बीएनएस कलम ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे दि. १७/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता श्री. यतीश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांनी दिवसा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना तपास पथक तयार करुन तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या. त्यानुसार स्थ...
बेशिस्त वाहनचालकांवर रोहा पोलीसांची करडी नजर नागरिकांनी नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे : पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांचे आवाहन रोहा (प्रतिनिधी) :- रोहा नगर परिषद व आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात कायदा सुव्यवस्था आणि बाजार पेठेतील वाहतूक समस्या या पार्श्वभूमीवर रोहा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती पाटील स्वतः रस्त्यावर उतरले असून नागरिकांना त्यांनी कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक समस्या विषयी जनजागृती केली, यावेळी ए.पी.आय. पवार, पाटील मॅडम, पेडवी मॅडम, कॉन्स्टेबर राऊत मॅडम, हेड कॉन्स्टेबल नरेश मोरे, कोटकर, वाहतूक नियंत्रक चौगुले मॅडम यांसह अन्य पोलिस गस्त घालत आहेत. बाजार पेठेत वाहन चालक बेशिस्तपणे वाहन पार्किंग करत आहेत, त्यामुळे नागरिकांना चालणे ही अवघड झाले आहे. दमखाडी सागर डेरी, राम मारुती चौक, तीनबत्ती नाका पोलीस चौकी, एस टी स्टॅण्ड परिसरात वाहन चालक बेशिस्तपणे आपली वाहने पार्किंग करून वाहतूक कोंडी करत असल्याने त्यांच्यावर आता पोलिसांची करडी नजर आहे. वाहतूक पोलिसांची गस्त वाढवली आहे. रोहा नगर परिषदेने दोन ठिकाणी वाहन पा...
