मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 लोणेरे येथील निर्घृण हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद! रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मुंब्र्यात धाडसी कारवाई 🚨

अलिबागमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू!
 रोहा येथील मायलेकाचा अपघात 


अलिबाग-रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली असून, भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास परहुरपाडा गावाच्या हद्दीत झालखंड-परहुरपाडा रोडवरील ओव्हाना बंगल्याजवळ घडला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रोहा येथील धावीर रोड, जामे मशिदीजवळील खालचा मोहल्ला येथे राहणारे फिर्यादी हे आपल्या ताब्यातील होन्डा शाईन मोटार सायकल (क्रमांक MH 06 BT 3653) वरून आपल्या आईला पाठीमागे बसवून रोहा ते मुशेत असा प्रवास करत होते. प्रवास करत असताना त्यांची दुचाकी परहुरपाडा परिसरातील ओव्हाना बंगल्याच्या परिसरात पोहोचली. त्याच वेळी समोरून पिवळ्या रंगाचा एक डंपर (क्रमांक MH 06 BD 9310) अत्यंत भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे अलिबागच्या दिशेने येत होता.

​डंपरचा वेग जास्त असल्याने आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फिर्यादी यांची मोटार सायकल अचानक स्लिप झाली. याच दरम्यान, दुचाकीच्या पाठीमागे बसलेली फिर्यादी यांची आई रस्त्यावर पडली आणि डंपरच्या मागील टायरखाली चिरडली गेली. या भीषण अपघातात त्या महिलेला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मल पिंपरी गावचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

​या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ अन्वये आरोपी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार निलेश वाणी हे करत असून, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog