मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

​उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा पुढाकार 

शिष्यवृत्ती आणि मोफत शिक्षणामुळे राज्यातील तरुणांना मिळणार मोठे पाठबळ

रायगड, दि. २२ (प्रतिनिधी) :- ​महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कौशल्य विकासासाठी खऱ्या अर्थाने एक मोठा आधारवड ठरत आहे. राज्याची युवाशक्ती शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हावी या उद्देशाने हा विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराभिमुख कौशल्यांवर विशेष भर देत सातत्याने कार्यमग्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता विविध प्रभावी शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केल्या आहेत. 

विशेष म्हणजे, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत शासनाने आता मुलींना व्यावसायिक शिक्षणात मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो विद्यार्थिनींना त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणे सुलभ झाले आहे. एकंदरित, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सवलतींच्या या महाजालातून 'सक्षम युवा आणि सक्षम महाराष्ट्र' घडवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग मोलाची भूमिका बजावत आहे. 

Comments

Popular posts from this blog