श्रीवर्धन तालुक्यात किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण नऊ जणांवर गुन्हा दाखल पर्यटकांची गुंडगिरी वाढली? श्रीवर्धन, दि. १४ (प्रतिनिधी) :- मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या दोघांना किरकोळ कारणावरून अडवून नऊ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना श्रीवर्धन तालुक्यातील गोँडघर येथील एच. पी. पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. काहीच दिवसांपूर्वी दिवेआगर येथे देखील पर्यटकांनी स्थानिकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता, तसेच यापूर्वी देखील रायगड जिल्ह्यात स्थानिकांसमोर पर्यटकांच्या अरेरावीचे प्रकार घडलेले असल्यामुळे रायगड जिल्ह्यात पर्यटकांची गुडगिरी वाढलीय का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडवली येथील रहिवासी फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत स्वतःच्या कारने मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. सोमवारी सकाळी ९:१५ च्या सुमारास ते डिझेल भरण्यासाठी गोँडघर येथील पेट्रोल पंपावर पोहचले. मात्र, पंपाच्या कोपऱ्यावर असलेल्या एका चहाच्...
मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
कल्याण-मुरबाड महामार्गावर काळाचा घाला रायते पुलावर भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू कल्याण, दि. १३ (मयुर धुमाळ) :- ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर आज सकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली. रायते गावाजवळील उल्हास नदीच्या पुलावर प्रवासी वाहतूक करणारी इको व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आज, १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास हा अपघात झाला. प्रवासी व्हॅन मुरबाडहून कल्याणच्या दिशेने जात असताना हा अपघात इतका भीषण होता की, धडकेमुळे व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला असून त्यात प्रवास करणाऱ्या ८ पुरुष आणि ३ महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे आणि कॉंक्रिटीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहनांचा वेग वाढला आहे, मात्र अनेकदा वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघातांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या मार्गावर धावणाऱ्या प्रवासी व्हॅनमध्ये अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जात असल्याचेही समोर आ...

Comments
Post a Comment