मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨
बेशिस्त वाहनचालकांवर रोहा पोलीसांची करडी नजर 
नागरिकांनी नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे : पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांचे आवाहन

रोहा (प्रतिनिधी) :- रोहा नगर परिषद व आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात कायदा सुव्यवस्था आणि बाजार पेठेतील वाहतूक समस्या या पार्श्वभूमीवर रोहा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती पाटील स्वतः रस्त्यावर उतरले असून नागरिकांना त्यांनी  कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक समस्या विषयी जनजागृती केली,
यावेळी ए.पी.आय. पवार, पाटील मॅडम, पेडवी मॅडम, कॉन्स्टेबर राऊत मॅडम, हेड कॉन्स्टेबल नरेश मोरे, कोटकर, वाहतूक  नियंत्रक चौगुले मॅडम यांसह अन्य पोलिस गस्त घालत आहेत.
बाजार पेठेत वाहन चालक बेशिस्तपणे वाहन पार्किंग करत आहेत, त्यामुळे नागरिकांना चालणे ही अवघड झाले आहे. दमखाडी सागर डेरी, राम मारुती चौक, तीनबत्ती नाका पोलीस चौकी, एस टी स्टॅण्ड परिसरात वाहन चालक बेशिस्तपणे आपली वाहने पार्किंग करून वाहतूक कोंडी करत असल्याने त्यांच्यावर आता पोलिसांची करडी नजर आहे. वाहतूक पोलिसांची गस्त वाढवली आहे. रोहा नगर परिषदेने दोन ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था केली आहे.
आगामी निवडणुका आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात रोहा शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मारुती पाटील स्वतः लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे तसेच नगर  परिषदेच्या पार्किंग ठिकाणी वाहन पार्किंग करून बाजार यावे असे आवाहन पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog