मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

फेक इंस्टाग्राम आयडी आणि जातीवाचक शिवीगाळ!
महिलेचा पाठलाग करून छळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल
 कर्जत येथील घटना 


कर्जत-रायगड, दि. २८ (प्रतिनिधी) :- ​कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा पाठलाग करून, तिचे नकळत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमजाई मंदिराजवळ, गुडगे (ता. कर्जत) येथे ही घटना घडली. पीडित महिला फिर्यादी या आपल्या घरी जात असताना, आरोपीने तिचा पाठलाग करण्याच्या उद्देशाने तिच्या नकळत तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. एवढ्यावरच न थांबता, फिर्यादीने आपल्याशी बोलावे याकरिता आरोपीने तिला इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या आयडीवरून सतत मेसेज पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच आरोपीने फिर्यादीच्या ईमेल आयडीवर अश्लील शिवीगाळ करत, जातीवाचक शब्द वापरून तिचा जाहीर अपमान केला आणि तिला हिणवले.

​यानंतर आरोपीने पीडितेची आणखी बदनामी करण्यासाठी तिचे एक फेक (बनावट) इंस्टाग्राम अकाउंट तयार केले. या फेक आयडीवर फिर्यादीचे अश्लील फोटो अपलोड करून ते लोकांना दिसतील अशी व्यवस्था केली. सोशल मीडियावरील हा छळ एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपीने फेसबुकवरही फिर्यादीच्या नावाने बनावट खाते (फेक अकाउंट) तयार केले. या फेसबुक अकाउंटद्वारे तो फिर्यादीच्या ओळखीच्या लोकांशी फिर्यादीच्याच नावाने चॅटिंग करत होता. या सर्व प्रकारामुळे मानसिक मनस्ताप सहन करावा लागल्यानंतर पीडित महिलेने कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

​या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २३८/२०२६ नुसार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम (आयटी ॲक्ट) २००० (२००८ च्या सुधारणेसह) चे कलम ६७, तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ७८ आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog