मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨

जिल्हा रूग्णालय अलिबाग येेथे 'नवशिक्या' डॉक्टरांना चढलाय माज!
अपंगांची अडवणूक करणाऱ्या 'विशाल' आणि 'शेरवानी फेम' डॉक्टरांचा माज उतरणार

रायगड-अलिबाग, दि. २६ (प्रतिनिधी) :- जिल्हा रूग्णालय अलिबाग येथे स्वतःला मोठे (विशाल) आणि 'शेरवानी' घालून स्टाईल मारून स्वतःल तज्ञ समजणाऱ्या डॉक्टरांच्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे जिल्हा रूग्ण्लयाच्या भोंगळ कारभाराबाबत सर्वत्र संतापाची लाट पसरल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जिल्हा रूग्णालय अलिबाग येथे 'फिजीओथेरपी व ओक्युपेशनल थेरपी विभाग' (१४ नंबर) या अपंग रूग्णांसंबंधित विभागात एक महिला अधिकारी नियुक्त केलेली आहे. या विभागात काही डॉक्टरांच्या 'ॲटीट्यूड' मुळे अपंगांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. परंतु यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या विभागात नियुक्त करण्यात आलेली महिला अधिकारी ही फक्त १० मिनीटे खुर्चीवर बसून नंतर गायब होते, आणि पुन्हा दोन-तीन तासांनी काही वेळ खुर्चीवर बसून पुन्हा गायब होते! त्यामुळे या विभागात 'नवशिक्या' आणि 'शेरवानी फेम' उद्धट वृत्तीच्या डॉक्टरांना मनमानी करण्याची संधी मिळू लागली आले. त्यामुळे या विभागात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती म्हणजे "निरर्थक नियुक्ती" असल्याचे दिसून आलेले आहे. इतका विचित्र प्रकार येथे घडत असताना देखील जिल्हा शल्य चिकीत्सक हे झोपा काढतात का? त्यांच्या संगनमतानेच हे गैरप्रकार सुरू आहेत का? असा सवाल येथे उपस्थित झालेला आहे.

येथील डॉक्टरांकडून अपंगांसोबत होणारी वागणूक हा सध्या चर्चेचा विषय बनून राहिला असून येथील डॉक्टरांना जास्तच माज चढल्याची संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी उच्चस्तरिय तक्रारी दाखल झालेल्या असून मुख्यमंत्री कार्यालयातून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अपंग रूग्णांसोबत दुश्मनाप्रमाणे वागणारे जिल्हा रूग्णालय अलिबाग येथील डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात अडकले असून या डॉक्टरांनी "लाज" सोडलीय का? हे डॉक्टर "चिरीमीरी" साठी अपंगांची अडवणूक करतात का? अशा अनेक संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
जिल्हा रूग्णालय अलिबाग येथे सिव्हील सर्जन यांचे नियंत्रण नसल्यामुळे येथील डॉक्टरांना जास्तच माज आल्याचे दिसून येत आहे. येथे दर बुधवारी अपंग रूग्ण तपासणीसाठी येतात परंतु येथील डॉक्टर हे त्यांच्या मर्जीतील (वशील्यावर आलेल्या) अपंगांना प्राधान्य देत असून इतर अपंग रूग्णांना कारणे सांगून हेलपाटे मारायला लावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे.
जिल्हा रूग्णालय अलिबाग येथे 'फिजीओथेरपी व ओक्युपेशनल थेरपी विभाग' (१४ नंबर) येथे दर बुधवारी अपंग रूग्णांची तपासणी केली जाते. एक महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या विभागातील डॉक्टर हे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचे कृत्य करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. येथे तपासणीसाठी आलेल्या अपंगांना अपमानास्पद वागणूक देऊन डॉक्टरांकडून त्यांची अडवणूक केली जात असल्याचा निंदनीय प्रकार येथे घडलेला आहे. येथे आलेल्या अपंग रूग्णांना पायाने व्यवस्थित चालता येत नाही, ते पायाने अपंग आहेत हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहून देखील येथील डॉक्टर अपंगांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना तपासणीसाठी वारंवार हेलपाटे मारायला लावीत असल्याचे दिसून आलेले आहे. रायगड जिल्हा रूग्णालय अलिबाग येथील कार्यपद्धतीवर जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे नियंत्रण नाही का? ते झोपा काढतात का? असा प्रश्न येथे उपस्थित झालेला असून अपंगांना त्रास देणाऱ्या येथील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


Comments

Popular posts from this blog